केरळमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागात हिजाब घालून जाण्याची मुसलमान विद्यार्थिनींची मागणी
महाविद्यालयाने मागणी फेटाळत समितीची केली स्थापना !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एम्.बी.बी.एस्.च्या ७ विद्यार्थिनींनी शस्त्रक्रिया विभागात (ऑपरेशन थिएटरमध्ये) हिजाब घालून जाण्याची अनुमती मागितली. ही धार्मिक परंपरा असल्याचे पत्र त्यांनी प्राचार्यांना लिहिले आहे. महाविद्यालयाच्या प्रशासनाने मात्र रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मागणी फेटाळली आहे.
ऑपरेशन थिएटर में हिजाब पहनने की मिले इजाजत: MBBS की 7 मुस्लिम छात्राओं का पत्र, केरल के सरकारी मेडिकल कॉलेज का मामला#Kerala #Hijab https://t.co/hhefhvYLFZ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 29, 2023
प्राचार्य डॉ. लिनेट जे मॉरिस यांनी सांगितले की, शस्त्रकर्माच्या वेळी संक्रमण होऊ नये; म्हणून डॉक्टरांना पूर्ण हात धुवावे लागतात. त्यामुळेच विद्यार्थिनींची मागणी मान्य करता येणार नाही. या मागणीवर अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारच्या मागण्या करून स्वतःच्या धर्माचे स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचाच हा प्रयत्न आहे. अनेक हिंदु विद्यार्थिनी कधी कपाळावर कुंकूही लावत नाहीत, त्या कधी असा धर्माभिमान दाखवतील का ? |