कल्याण येथे दुर्गाडी किल्ल्यावर शिवसैनिकांचे घंटानाद आंदोलन !
|
कल्याण – बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदु भाविकांना देवीच्या दर्शनासाठी प्रवेश बंद असतो. तो खुला करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते. २९ जून या दिवशीही शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते या आंदोलनात एकत्रितपणे सहभागी झाले होते.
कल्याणमधील दुर्गाडी येथे शिवसैनिकांचे घंटानाद आंदोलन
#kalyan #Update https://t.co/8RDMhkBIUp
— LoksattaLive (@LoksattaLive) June 29, 2023
शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून लालचौकी भागातील रस्ते सुरक्षा अडथळे उभारून बंद केले होते; परंतु आक्रमक शिवसैनिकांनी अडथळे ओलांडून दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात वाद झाला. पोलिसांनी तात्काळ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल देशात अल्पसंख्यांकांच्या सणाच्या दिवशी हिंदूंना देवीच्या दर्शन घेण्यावर बंदी घातली जाणे संतापजनक ! |