अरब वंशाच्या तरुणाच्या हत्येमुळे संपूर्ण फ्रान्समध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार !
|
पॅरिस (फ्रान्स) – पॅरिसचे उपनगर नानतेरे भागात पोलिसांनी नाहेल एम्. नावाच्या एका किशोरवयीन मुलाची हत्या केल्याच्या निषेधार्थ देशभरात धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार करण्यात येत आहे. २७ जून या दिवशी झालेल्या या घटनेनंतर देशातील विविध भागांत जाळपोळ आणि दगडफेक यांच्या अनेक घटना घडल्या. पॅरिसमधील अनेक पोलीस ठाण्यांना फटाक्यांद्वारे जाळण्याचा प्रयत्न झाला. शाळा, बस आणि अनेक चारचाकी वाहने यांना आग लावण्यात आली. सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असलेल्या व्हिडिओजमध्ये जाळपोळ करणारे लोक ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत असल्याचे दिसत आहे. दुकाने लुटण्याच्या घटनाही घडत आहेत. आंदोलनकारी हे पोलीस आणि सुरक्षादले यांच्यावर आक्रमण करत आहेत. फ्रान्सचे दक्षिणी शहर तोलाउसमध्ये पोलीस आणि आंदोलनकारी यांच्यामध्ये दगडफेक झाली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत संपूर्ण फ्रान्समध्ये १५० लोकांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात २४ पोलीस कर्मचारीही घायाळ झाले आहेत.
Widespread violence in France following police shooting of a teenager – All you need to know
https://t.co/mp4TG638l3— OpIndia.com (@OpIndia_com) June 29, 2023
फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन यांनी हत्येच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचारावर ‘असहनीय हिंसाचाराची रात्र’ अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक प्रतिष्ठित फ्रेंच नागरिकांनीही पोलिसांचा निषेध केला असून राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रॉन यांनी ‘ही हत्या अस्वीकारार्ह आणि अक्षम्य आहे. या हत्याकांडाला न्यायोचित म्हणता येणार नाही !’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मॅक्रॉन यांच्या या वक्तव्यावरून पोलीसही संतप्त झाले असून राष्ट्रपतींनी थेट पोलिसांना गुन्हेगार ठरवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या घटनेवरून पोलिसांच्या संदर्भातील विशेषत: अल्पसंख्य मुसलमानांना दिल्या जात असलेल्या वागणुकीवरून ही मागणी केली जात आहे. गेल्या वर्षी वाहतुकीचे नियम मोडण्याच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये १३ नागरिकांचा मृत्यू झाला होता.
दोन्ही बाजूंनी घटनेचे अन्वेषण करण्यात येत आहे. तरुणावर अनावश्यकरित्या गोळीबार करण्यात आला, या दृष्टीने अन्वेषण करण्यासह पोलिसांना इजा पोचवण्याचा तरुणाचा प्रयत्न असल्याकारणाने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला का, हेसुद्धा पडताळून पाहिले जाणार आहे.
काय आहे प्रकरण ?
२७ जूनच्या सायंकाळी १७ वर्षीय नाहेल एम्. हा उत्तर आफ्रिकी म्हणजेच अरब वंशाचा तरुण पॅरिसच्या उपनगर नानतेरेमधून चारचाकी घेऊन चालला होता. त्याने वाहतुकीचे नियम पाळण्यावरून नकार दिल्याने तेथे उपस्थित पोलिसांनी त्याच्यावर जवळून गोळीबार केला. गोळी त्याच्या छातीत घुसली. थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात फ्रेंच पोलिसांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले की, नाहेल त्याची चारचाकी पोलिसांवर घालण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. प्रत्यक्षात या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये पोलीस खोटे बोलत असल्याची चर्चा आहे. यामुळे लोक अधिक संतप्त झाले आहेत.
संपादकीय भूमिका
|