आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विठ्ठलभक्तांना मराठीतून शुुभेच्छा !
बकरी ईदनिमित्तही मुसलमानांना शुभेच्छा !
मुंबई – सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ! हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरून भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो ! भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल!, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांना आषाढी एकादशीच्या मराठीतून शुभेच्छा ट्वीटद्वारे दिल्या आहेत. या वेळी त्यांनी बकरी ईदनिमित्तही शुभेच्छा दिल्या.
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय…
— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2023