पाकमध्ये अल्पवयीन भावांचे लैंगिक शोषण करून हत्या करणार्या मदरशातील शिक्षकाला मृत्यदंडाची शिक्षा !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील मदरशांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. आता पाकच्या पंजाब प्रांतातील एका मदरशात शिकणार्या दोन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांची हत्या करणारा शिक्षक तनवीर अहमद याला तेथील न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्याला या कुकृत्यात साहाय्य करणार्या नौमान यालाही जन्मठेपेशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासह या दोघांना प्रत्येकी १० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
पाकिस्तान में मदरसा छात्रों पर उनके शिक्षकों द्वारा यौन उत्पीड़न की लगातार घटनाएं हो रही हैं.#PakistanNews https://t.co/tKNPKd3JsC
— Zee News (@ZeeNews) June 29, 2023
ही घटना लाहोरपासून १३० किमी दूर ओकारा शहरातील असून ६ वर्षीय आणि १० वर्षीय मृत मुले भाऊ होते. अहमदने दोघांवर अत्याचार करून त्यांचा गळा घोटला होता.
संपादकीय भूमिकाभारतातीलच नव्हे, तर पाकमधील मदरशांमध्येही अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. प्रसिद्ध इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार आता केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील मदरसे बंद करण्याची वेळ आली आहे ! |