‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना ठार मारण्याची पुन्हा धमकी
अमेठी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथे २८ जून या दिवशी ‘भीम आर्मी’चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात आझाद घायाळ झाले होते. या प्रकरणी आता फेसबुकवरील ‘क्षत्रिय ऑफ अमेठी’ नावाच्या खात्यावरून आझाद यांना धमकी देण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. गोळीबारानंतरही या खात्यावर ‘आझाद पुढच्या वेळी वाचणार नाही’, असे लिहिण्यात आले आहे.
भीम आर्मी के प्रमुख चंद्र शेखर आजाद (#ChandraShekharAzad) को उन पर गोली चलाए जाने से चार दिन पहले ‘क्षत्रीय ऑफ अमेठी’ नाम के फेसबुक पेज पर जान से मारने की धमकी मिली थी।
पोस्ट में लिखा था, “चंद्रशेखर को जिस दिन मारेंगे, अमेठी के ठाकुर ही मारेंगे – वो भी दिन-दहाड़े बीच चौराहे।”… pic.twitter.com/qRhYIF9ehd
— IANS Hindi (@IANSKhabar) June 29, 2023
गोळीबाराच्या ४ दिवस आधीही आझाद यांना या खात्यावरून ‘आझाद यांना चौकामध्ये दिवसाढवळ्या मारू’, अशी धमकी देण्यात आली होती. यासह प्रसारित करण्यात आलेल्या एक व्हिडिओत एका तरुणाच्या हातात तलवार असल्याचे दिसत होते.