स्विडनमध्ये न्यायालयाच्या अनुमतीने निदर्शकाने मशिदीबाहेर जाळले कुराण !
|
स्टॉकहोम (स्विडन) – बकरी ईदच्या दिवशी येथील एका मशिदीबाहेर एका व्यक्तीने कुराण जाळले. यासाठी त्याने न्यायालयाकडून अनुमती घेतली होती. न्यायालयाने या व्यक्तीला एक दिवसासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांतर्गत निदर्शन म्हणून ही अनुमती दिली होती. या व्यक्तीने प्रथम कुराणाची काही पाने फाडली आणि त्याद्वारे त्याचे बूट पुसले, नंतर त्यात खारवून वाळवलेले डुकराचे मांस ठेवले आणि त्याला आग लावली. यानंतर त्याने स्विडनचा ध्वजही फडकावला. ही घटना पहाणार्या उपस्थित २०० लोकांपैकी काही जणांनी त्याचे समर्थन केले, तर काही जणांनी निषेधार्थ घोषणा दिल्या. या वेळी एका व्यक्तीने कुराण जाळणार्या व्यक्तीवर दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. कुराण जाळल्याच्या या घटनेचा निषेध म्हणून तुर्कीयेतील नागरिकांनी स्विडनचा राष्ट्रध्वज जाळला.
स्वीडन में फाड़ी और जलाई जाएगी कुरान, वो भी मस्जिद के सामने: कोर्ट और पुलिस ने दे दी है अनुमति, बकरीद के वक्त प्रदर्शन का ऐलान#Sweden #QuranBurning #Bakrid #Quranhttps://t.co/9JzLHMZU2E
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 28, 2023
१. तुर्कीयेचे परराष्ट्रमंत्री हकन फिदान यांनी या घटनेविषयी ट्वीट करून म्हटले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही इस्लामविरोधी निदर्शने करू शकत नाही. आम्ही ते मान्य करणार नाही. जर कोणत्याही देशाला ‘नाटो’मध्ये (‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली सैनिकी संघटना)सहभागी होऊन भागीदार बनायचे असेल, तर त्याला इस्लामविषयी द्वेष पसरवणार्या आतंकवाद्यांवर नियंत्रण ठेवावे लागेल.’ स्विडनला ‘नाटो’ देशांचा सदस्य व्हायचे आहे आणि तुर्कीयेचे समर्थन मिळाले नाही, तर ते शक्य होणार नाही.
२. स्विडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन म्हणाले की, या निदर्शनाचा आमच्या संभाव्य ‘नाटो’ सदस्यत्वावर काय परिणाम होईल ? याचा अंदाज लावायचा नाही. या प्रकाराचा निषेध कायद्याच्या कक्षेत येतो; पण तरीही ते योग्य नाही. याप्रकरणी काय कारवाई करायची ? हे पोलीसच ठरवतील. नागरिकांच्या विरोधानंतर पोलिसांनी कुराण जाळणार्या व्यक्तीवर एका धर्माला लक्ष्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
३. याच वर्षी जानेवारी मासामध्ये काही लोकांनी स्विडनमधील तुर्कीयेच्या दूतावासाबाहेर निदर्शने करून कुराण जाळले होते. यास प्रत्युत्तर म्हणून तुर्कीयेची राजधानी अंकारामध्ये असलेल्या स्विडनच्या दूतावासाबाहेर निदर्शने करत लोकांनी स्विडनचा झेंडा जाळला होता.
४. फेब्रुवारीमध्ये स्विडिश पोलिसांनी निदर्शकांना इराकच्या दूतावासाबाहेर आंदोलन करू दिले नाही. तेव्हाही कुराण जाळण्यात येणार होते. ‘नाटो’विरोधी एका गटावर कुराणाची प्रत जाळण्यावर बंदी घालण्यात आली होती; परंतु न्यायालयाने ही बंदी यावर्षी एप्रिलमध्ये उठवली होती. न्यायालयाने म्हटले, ‘देशाच्या घटनेनुसार लोकांना संघटित होऊन आंदोलन करण्याचा अधिकार आहे.’ अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगत न्यायालयाने या निदर्शनांना मान्यता दिली.
संपूर्ण जगभरात इस्लामवर बंदी घातली पाहिजे ! – सलवान मोमिकासलवान मोमिका याने कुराण जाळण्यामागील कारण सांगतांना म्हटले की, आम्ही सांगू इच्छितो की, आता वेळ आली आहे की, स्विडनने जागे झाले पाहिजे. आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या विचारांच्या आणि परंपरांच्या विरोधात आहोत. इस्लाम धर्मामुळे नकारात्मक परिणाम झाला आहे. संपूर्ण जगभरात इस्लामवर बंदी घातली पाहिजे. |