उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यामुळे हिंदु पीडितेला न्याय !
१. उत्तरप्रदेशमध्ये हिंदु असल्याचे सांगून बलात्कार करणार्या धर्मांधाच्या विरोधात पीडितेची पोलीस तक्रार
‘धर्मांध चांदबाबू याने विशाल या नावाने एका हिंदु मुलीला लग्न करण्याचे खोटे आमीष दाखवले आणि तिच्याशी ४-५ मास शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला. त्यानंतर सतत तिला मारहाण मरून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. त्यामुळे तिने त्याच्या विरुद्ध बरेलीच्या (उत्तरप्रदेश) एका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी धर्मांधाला अटक करून त्याच्या विरोधात बलात्कार करणे, खोटी ओळख देऊन फसवणे, धर्मांतरासाठी दबाव आणणे या आरोपांखाली भारतीय दंड विधान कलम ३७६ (२), ५०६, ४२०, तसेच ‘उत्तरप्रदेश अवैध धर्मांतर प्रतिबंध कायद्या’तील कलम ५ आणि ३ या कलमांखाली गुन्हा नोंदवला.
२. न्यायालयाचा धर्मांधाला जामीन देण्यास नकार
या प्रकरणातील अन्वेषण झाल्यावर धर्मांधाने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. या अर्जामध्ये ‘आम्ही दोघेही सज्ञान असून आम्हाला लग्न करायचे असल्याने आरोपीला जामिनावर सोडण्यात यावे’, असे सांगण्यात आले. या अर्जाला पीडितेने विरोध केला. न्यायाधिशांच्या समोर पीडितेने साक्ष नोंदवतांना स्पष्ट सांगितले, ‘‘धर्मांधाने त्याची विशाल या हिंदु नावाने ओळख सांगितली आणि विश्वासघात केला. त्यानंतर तिचे नको त्या अवस्थेतील छायाचित्रे काढून तिला ‘ब्लॅकमेल’ केले आणि मारहाण केली. एवढेच नाही, तर सतत छळ करून ५ मास बलात्कार केला. धर्मांतरासाठी तिच्यावर दबावही आणला.’’ या प्रकरणात सरकारी अधिवक्ता आणि पीडितेचे अधिवक्ता यांनी चांगला अभ्यास करून जामिनाला विरोध केला. त्यामुळे गुन्हा सिद्ध होऊन न्यायमूर्तींनी आरोपीचा जामीन नाकारला. हिंदूंना समाधान देणारी अशी एखादीच घटना घडते. अन्यथा ‘मुलगी सज्ञान असून तिने अनेक मास धर्मांधासमवेत राहून सुख मिळवले’, असे कारण देऊन धर्मांधाला मोकाट सोडले जाते.
३. हिंदु महिलांनी चित्रपटसृष्टी आणि सामाजिक माध्यमे यांच्यापासून सावध रहाणे आवश्यक !
सध्या शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय यांमुळे बहुतांश हिंदू त्यांच्या कुटुंबापासून स्वंतत्र रहातात. त्यातही प्रत्येक व्यक्ती ऐहिक गोष्टींमध्ये व्यस्त असल्याने ते घरात राहूनही एकमेकांपासून दूर असतात. अशा स्थितीत सामाजिक माध्यमांनी हिंदु महिला आणि मुली यांच्याशी जेवढी जवळीक साधली, दुर्दैवाने तेवढी जवळीक रक्ताच्या नातेवाइकांनीही साधली नाही. या माध्यमांनी त्यांना खोट्या जंजाळात फसवले आहे. ते त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील, असे त्यांना वाटते. त्यामुळे हिंदु स्त्रिया अधिक वेळ सामाजिक माध्यमांमध्ये अडकलेल्या असतात. चित्रपटांमध्ये जाणीवपूर्वक हिंदु नायिका आणि धर्मांध नायक दाखवला जातो. या माध्यमातून थेट ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जाते आणि हिंदू पैसे व्यय करून असे चित्रपट पहात असतात. त्यामुळे हिंदु मुली-महिला अल्पावधीत वासनांध धर्मांधांच्या जाळ्यात ओढल्या जातात. धर्मांध कावेबाज असल्याचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मग हिंदु मुली-महिलांच्या नशिबी आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक त्रास येतो, जो त्यांनी स्वत:हून ओढवून घेतलेला असतो.
४. ‘लव्ह जिहाद’ अजून किती हिंदु मुलींना फसवणार ?
आज कोणत्याही वृत्तपत्रामध्ये हिंदु मुलीने ‘लव्ह जिहाद’मध्ये फसून आयुष्य उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. काही वृत्तपत्रे तर धर्मांध दुखावले जाऊ नये; म्हणून आरोपीची खरी नावेही लपवून ठेवतात. अनेक हिंदु मुली धर्मांधांशी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहातात. ‘लव्ह जिहाद’ची समस्या भयंकर आहे. दुर्दैवाने ती हिंदूंना अजून कळलेली नाही आणि प्रशासनाला त्याचे सुवेरसुतक नाही. त्यामुळे याविरोधात केंद्र पातळीवर कठोर कायदे नाहीत. ज्या राज्यांमध्ये कायदे आहेत, त्यातही या प्रकरणाचे गांभीर्य न दाखवता केवळ धर्मांतर रोखणे एवढाच हेतू दिसून येतो. याचे दु:ख ज्यांच्या मुलीचे आयुष्य ‘लव्ह जिहाद’मध्ये उद्ध्वस्त झाले, त्यांना विचारले पाहिजे. ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या मुली सर्वार्थाने पीडित ठरतात. असे असतांना त्याविरोधात पाहिजे तसे कठोर कायदे झालेले नाहीत. ‘यासंदर्भात सरकारही विशेष जागरूक नाही’, असे खेदाने म्हणावे लागते. या सर्वातून हिंदु राष्ट्राची स्थापना किती आवश्यक आहे, हे येथे नमूद होते.’
श्रीकृष्णार्पणमस्तु !
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (७.६.२०२३)