श्री विठ्ठलाला करायच्या प्रार्थना !
देवतेला प्रार्थना केल्यामुळे आपली तिच्यावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते. भावपूर्ण केलेल्या प्रार्थनेमुळे देवतेशी असलेल्या अनुसंधानात वाढ होते, तसेच मनःशांती मिळते आणि देवतेचा आशीर्वादही लाभतो. श्री विठ्ठलाला करायच्या काही प्रार्थना पुढे दिल्या आहेत.
१. हे विठ्ठला, तू भक्तीचा भुकेला आहेस. तुझ्या चरणांशी येण्यासाठी तुझी भक्ती तळमळीने कशी करायची, हे तूच मला शिकव, ही तुझ्या चरणी प्रार्थना !
२. हे विठ्ठला, धर्मरक्षण करणे, ही काळानुसार आवश्यक अशी तुझी उपासनाच आहे. त्यासाठी तूच मला भक्ती आणि शक्ती दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना ! ॐ