प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तीभावाने भरवलेला पेढा प्रत्यक्ष ग्रहण करणार्या पांडुरंगाचे भक्तवात्सल्य !
इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला. तेव्हा तो गायब झाला. बडव्यांनी तेथील सर्व हार दूर केले. त्यांना पेढा कोठेही मिळाला नाही. बाबांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श केला, तेव्हा त्यांना उजव्या चरणाजवळ अर्धा पेढा मिळाला. प.पू. बाबा भक्तांना म्हणाले, ‘‘आनंदाश्रू ‘गुरुमाऊलीने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडवले आणि मी पांडुरंगाला पेढा भरवला’, या विचाराने, तर दुःखाश्रू ‘परमेश्वराला पाषाणातून प्रत्यक्ष यायला किती कष्ट पडले असतील’, या विचाराने आले. (संदर्भ : sanatan.org)