हे सख्याहारी हृदयारविंद ।
तुझी कृपा होवो
श्रीहरि पांडुरंग !
हे परम शक्तीशाली गोविंद ।
हे मनमोहन माधव मुकुंद ।। १ ।।
दर्शन घेता तुझे पांडुरंग ।
मजवर चढला भक्तीचा रंग ।। २ ।।
पाहुनी तुजला पांडुरंग ।
धन्य झाले श्रीरंग ।। ३ ।।
टाळ, चिपळ्या आणि मृदंग ।
मधुर स्वरात गातात तुझाच अभंग ।। ४ ।।
हे भक्तवत्सल पांडुरंग ।
सदैव लाभो तुझा दिव्य संग ।। ५ ।।
संत सज्जनांचे पवित्र अंतरंग ।
सदैव लाभो तयांचा भावसत्संग ।। ६ ।।
जसे पाण्यावर उमटतात जलतरंग ।
तैसे तुला पाहूनी उमटले भावतरंग ।। ७ ।।
हे सख्याहारी हृदयारविंद ।
तुझी कृपा होवो श्रीहरि पांडुरंग ।। ८ ।।
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),
(आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२३)