वारकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी ३० जूनला पंढरपूर येथे भव्य वारकरी अधिवेशन ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
पंढरपूर – वारकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी आषाढ शुक्ल द्वादशीला (३० जून) पंढरपूर येथे भव्य वारकरी अधिवेशन घेण्यात येणार आहे. हे अधिवेशन परमपूज्य श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या अधिवेशनात नामवंत संत-महंत, मान्यवर, ह.भ.प., धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तरी या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने वारकर्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे.