कोकण रेल्वेमार्गावर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला प्रारंभ : रत्नागिरीत जोरदार स्वागत
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरील पहिली वन्दे भारत एक्सप्रेस २७ जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागली. मडगाव – मुंबई वन्दे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आलेल्या वन्दे भारत एक्सप्रेसचे ढोल-ताशाच्या गजरात आणि फुलांचा वर्षाव करत रत्नागिरीवासियांनी जोरदार स्वागत केले.
मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे रत्नागिरी येथे भव्य स्वागत करण्यात आले. #VandeBharatExpress #VandeBharat #वंदे_भारत_ट्रेन #वंदे_भारत_एक्सप्रेस #VandeBharatTrain #Maharashtra #LatestVideo #Latest #Marathi pic.twitter.com/8Ee7IYbU2N
— Rashtrasanchar (@sanchar_rashtra) June 27, 2023
या वेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रवींद्र कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वन्दे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ही गाडी विशेष निमंत्रितांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली.