अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणार्या अश्रफ शेखला अटक
संख्येने अल्पसंख्यांक; मात्र गुन्हेगारीत बहुसंख्यांक असणारे धर्मांध !
रत्नागिरी – येथील मासळी बाजारात टर्की अमली पदार्थ विक्रीसाठी स्वत:जवळ बाळगणार्या अश्रफ उपाख्य अडर्या महमूद शेख या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी २५ जूनला अटक केली. त्याच्याकडून १६ सहस्र ८०० रुपयाचा १.७३ ग्रॅमचा टर्की अमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिसांत अश्रफ शेख याच्यावर अनेक गुन्हे नोंद असून त्याची अट्टल गुन्हेगार म्हणून नोंद आहे.
शहरातील मासळीबाजारातील खान कॉम्प्लेक्स येथे अवैध अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून शेखला अटक केली. त्याच्याकडून टर्की हा अमली पदार्थ, तसेच रोख १२ सहस्र ५३० रुपये आणि मोबाईल असा एकूण ३४,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अधिक अन्वेषण शहर पोलीस करत आहेत.