समान नागरी कायद्याला आम आदमी पक्षाचे समर्थन
नवी देहली – आम आदमी पक्षाने समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे. पक्षाचे नेते संदीप पाठक यांनी सांगितले की, आम्ही सैद्धांतिक मार्गाने समान नागरी कायद्याचे समर्थन करतो. घटनेतील कलम ४४ हेही या कायद्याचे समर्थन करते. देशात समान नागरी कायदा असला पाहिजे; पण हे सूत्र सर्वच धर्म आणि संप्रदाय यांतील लोकांशी जोडलेले आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटते की, या सूत्रावर मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला हवी. सर्वच राजकीय पक्षांनी या सूत्रावर चर्चा करायला हवी; कारण काही सूत्रे अतिशय मूलभूत असतात. त्यावर एकत्रितपणे विचार व्हावा. केवळ अधिकारवाणीने हा कायदा कार्यान्वित केला जाऊ नये.
The #AAP on Wednesday supported the implementation of the #UniformCivilCode across the country but only after a wide consensus is built through consultation with all stakeholders.https://t.co/tcVAlmZCtU
— The Times Of India (@timesofindia) June 28, 2023