विरोध करणार्‍या हिंदूंवरच पोलिसांकडून गुन्हा नोंद !

मीरा रोड येथे मुसलमानाने सोसायटीत २ बकर्‍या आणल्याचे प्रकरण

मीरा रोड – येथील हायराईज सोसायटीत मोसीन शेख यांनी २ बकर्‍या ‘कुर्बानी’ देण्यासाठी आणल्या होत्या. बकर्‍या आणल्याचे समजल्यावर इमारतीतील हिंदूंनी शेख यांना, ‘बकर्‍या तेथून दुसरीकडे न्याव्यात’, अशी मागणी केली. हिंदूंनी शेख आणि त्यांचे कुटुंबीय यांची परस्पर चौकशी करण्यास प्रारंभ केल्याने शेख यांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली. हिंदूंनी तेथे हनुमान चालिसाचे पठण केले आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. आंदोलन करणारे आणि पोलीस यांच्यात वाद झाला. पोलिसांनी आंदोलन करणार्‍यांची समजूत घातली. या वेळी शेख यांच्या कुटुंबियांची अवैधपणे अडवणूक करून गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी हिंदूंच्या विरोधात दंगल करणे आणि अन्य कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

१. पोलीस अधिकार्‍यांनी इमारतीतील लोकांना सांगितले, ‘‘इमारतीच्या नियमांच्या अंतर्गत कुठल्याही रहिवासी इमारतीत कुर्बानी दिली जाऊ शकत नाही. आम्ही असे होऊ देणार नाही. जर असे झाले, तर आम्ही संबंधितांना अटक करू. आम्ही शेख यांना बकर्‍या येथून घेऊन जाण्यास सांगत आहोत.’’

२. या प्रकरणी मोसीन शेख म्हणाले, ‘‘आमच्या इमारतीत २०० ते २५० मुसलमान कुटुंबे रहातात. प्रतीवर्षी बकर्‍या ठेवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून आम्हाला जागा दिली जाते. यावर्षी ती दिली गेली नाही. बकरी ईद निमित्त इमारतीमध्ये ‘कुर्बानी’ करणार नसून केवळ काही दिवसांसाठी बकर्‍या ठेवण्यासाठी जागा देण्यात यावी, अशी मागणी आम्ही सोसायटीच्या पदाधिकार्‍यांकडे केली होती; मात्र ही मागणी सोसायटीधारकांनी मान्य केली नसल्यामुळे नाईलाजास्तव बकर्‍यांना घरीच ठेवले.’’

३. घरामध्ये बकरे आणून ठेवल्यानंतर पुढे काहीही होऊ शकते, असा अंदाज स्थानिक हिंदूंनी व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

  • अवैध वर्तन करून समाजभान न जोपासणार्‍या मुसलमानांवर नव्हे, तर निष्पाप हिंदूंवरच गुन्हे नोंदवणारे पोलीस ! हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस मुसलमानांसमोर नांगी टाकतात, हे लक्षात घ्या !
  • दंगली असोत किंवा हिंसाचार धर्मांधांवर नव्हे, तर पीडित हिंदूंवर कारवाई करणार्‍या पोलिसांचे वर्तन पहाता अशांचा भरणा असलेले पोलीसदल विसर्जित करून तेथे कर्तव्यदक्ष आणि तत्त्वनिष्ठ पोलिसांची भरती होणे आवश्यक !