पाकिस्तानमध्ये माजी हिंदु खासदाराच्या घरावर फिरवण्यात आला बुलडोजर !
इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते असल्याने झाली कारवाई !
कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील उमरकोट येथे ‘पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफ’ (पीटीआय) या पक्षाचे माजी खासदार लाल चंद्र माल्ही यांच्या घरावर बुलडोजर फिरवून ते पाडण्यात आले. माल्ही यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.
Condemn the demolition of Lal Malhi’s family house in Umer Kot by the PPP government. Lal Malhi is the President of PTI’s minority wing.
The fascist tactics employed by the State to force PTI leaders & workers to dissociate from the party has not only weakened our democracy,… pic.twitter.com/CTrTrlqXKe
— Imran Khan (@ImranKhanPTI) June 27, 2023
माल्ही हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे मानले जातात. माल्ही हे सिंधमधील पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. ते संसदेमध्ये मानवाधिकार समितीचेही प्रमुख होते. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते असल्याने त्यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप माल्ही यांनी केला आहे.