‘वैश्‍विक हिंदू राष्‍ट्र महोत्‍सवा’निमित्त गोवा येथे आलेल्‍या मान्‍यवरांनी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर दिलेले अभिप्राय

१. ‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘आश्रमातील चैतन्‍यात वाढ होत आहे’, असे जाणवले.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

२. ‘संगीत साधनेतून संतपदापर्यंत जाऊ शकतो’, हे लक्षात येणे

‘संगीत आणि संशोधन’ या विषयावरील ‘पी.पी.टी. (Power Point Presentation)’ पाहिल्‍यावर ‘नकारात्‍मक आणि सकारात्‍मक ऊर्जा म्‍हणजे काय ? अन् संगीत साधनेतून आध्‍यात्मिक उन्‍नती करता येऊन संतपदापर्यंत जाऊ शकतो’, हे लक्षात आले. या संशोधनातून संगीतातील सूक्ष्म परीक्षण अनुभवण्‍यास मिळाले.

– श्री. जनार्दन सखाराम जाधव,अध्‍यक्ष, बाबूमामा सामाजिक प्रतिष्‍ठान, खोपोली, जिल्‍हा रायगड, महाराष्‍ट्र.

  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक