रुग्णाईत असतांनाही शांत, स्थिर आणि निर्विकार स्थितीत असलेल्या पू. श्रीमती कला प्रभुदेसाई !
‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी आम्हाला (श्री. रवींद्र प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६० वर्षे), आम्ही दोघी बहिणी सौ. मेघा मुकुंद देवधर (वय ६२ वर्षे) आणि मी (सौ. भक्ती गैलाड (वय ५७ वर्षे)) अन् माझे यजमान श्री. प्रमोद अनंत गैलाड (वय ६० वर्षे) यांना) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दर्शनाचा लाभ झाला. या वेळी मी प.पू. डॉक्टरांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांनी पू. आईंविषयी (पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई यांच्याविषयी) काढलेले उद़्गार सांगितले, ‘पू. आजींच्या (पू. आईंच्या) त्वचेवर ‘ॐ’ आला असून पू. आजींच्या देहामध्ये काही दैवी पालट जाणवत आहेत.’
१. पू. आईंच्या शरिरातील सोडियमची पातळी न्यून होणे आणि कोरोना होणे, यांमुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागणे; मात्र सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने त्या बर्या होणे
डिसेंबर २०२० मध्ये पू. आईंच्या शरिरातील सोडियमची पातळी न्यून झाली होती आणि त्यांची कोरोनाची चाचणीही सकारात्मक आली होती. त्यामुळे पू. आई रुग्णालयात भरती होत्या. त्यांची शक्ती पुष्कळ न्यून झाली होती; परंतु औषधोपचार आणि श्री गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मिळणार्या आध्यात्मिक उपायांच्या नामजपांमुळे त्यांची प्रकृती बरी झाली.
२. वर्ष २०२१ मध्ये पू. आईंचा रक्तदाब वाढून ‘अंगावर सूज येणे, दम लागणे’, असे त्रास होत असूनही त्यांचा चेहरा निर्विकार असणे
२२.११.२०२१ च्या रात्री पू. आईंना पुष्कळ दम लागला होता आणि त्यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यांच्या पूर्ण अंगावर सूज आली होती. दुसर्या दिवशी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले; पण त्यांच्या चेहेर्यावर कुठलाही त्रास दिसत नव्हता; उलट चेहेर्यावर एक निर्विकारपणा दिसत होता. तेव्हा आम्हाला प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’ या वचनाचा प्रत्यय आला.
३. वर्ष २०२३ च्या मे मासात फुफ्फुसात जंतूसंसर्ग होऊनही चेहर्यावर निर्मळ हास्य असणे
२३.५.२०२३ या दिवशी पू. आईंना फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात भरती केले होते. पू. आजींना प्राणवायू देण्यासाठी नळी लावली होती. अशा स्थितीमध्येही ‘त्यांना काही त्रास होत आहे’, असे अजिबात दिसत नव्हते. त्यांचा चेहरा शांत आणि तेजस्वी दिसत होता. त्यांच्या हसण्यामध्ये निर्मळता दिसत होती.
४. पू. आईंचेे तळहात गुलाबी रंगाचे झाले असून त्वचा मऊ झाली आहे.
५. हातावर सूज दिसत असूनही तळहाताच्या मागील बाजूची त्वचा सात्त्विक, पारदर्शी आणि प्रकाशमान दिसते.’
– सौ. भक्ती गैलाड (पू. श्रीमती कला प्रभुदेसाई आजींची मुलगी) (वय ५७ वर्षे), ठाणे. (२६.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |