नांदेड येथील गोरक्षकांवर झालेल्‍या आक्रमणाची एस्.आय.टी.च्‍या माध्‍यमातून कारवाई करा !

उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

दर्यापूर (जिल्‍हा अमरावती) येथील गोरक्षकांची निवेदनाद्वारे मागणी

दर्यापूर, २७ जून (वार्ता.) – नांदेड येथे गोरक्षकांवर झालेल्‍या आक्रमणात एका गोरक्षकाची हत्‍या करण्‍यात आली, तर अन्‍य गोरक्षक गंभीर घायाळ झाले आहेत. या प्रकरणाची एस्‌आयटीच्‍या माध्‍यमातून तात्‍काळ कारवाई करावी, तसेच या प्रकरणातील सर्व गोरक्षकांच्‍या कुटुंबियांना आर्थिक साहाय्‍यता शासनाने द्यावी, अशा मागणीसाठी अमरावती जिल्‍ह्यातील दर्यापूर येथे उपविभागीय अधिकारी मनोज लोनारकर यांना मुख्‍यमंत्र्यांच्‍या नावे गोरक्षकांनी निवेदन दिले. या वेळी बजरंग दलाचे सर्वश्री राज वानखडे, शुभम कोरे, मुकेश काळे, तसेच सर्वश्री आदित्‍य अंबुलकर, अथर्व काळे, ओम राणे, ऋग्‍वेद टापरे, यश कोतवाल हे गोरक्षक उपस्‍थित होते.

संपादकीय भूमिका

गोरक्षकांवरील आक्रमणाच्‍या चौकशीविषयी गोरक्षकांनाच सांगावे का लागते ? पोलीस स्‍वतःहून कारवाई का करत नाहीत ?