दुधाचा दर निश्चित करण्यासाठी सरकारकडून समिती गठीत !
मुंबई, २७ जून (वार्ता.) – राज्यात दुधाला किमान दर मिळावा, यासाठी राज्यशासनाने समिती गठीत केली आहे. राज्याच्या दुग्धव्यवसाय विकास समितीचे आयुक्त या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. या समितीमध्ये राज्यातील सहकारी आणि दूध संघाच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे.
राज्यात खासगी आणि सहकारी दूध संघ यांच्याकडून प्रामुख्याने दुधाची खरेदी होते. दुधाचे उत्पादन अल्प असतांना दुधाला चांगला दर मिळतो; मात्र दुधाचे उत्पादन अधिक असते, तेव्हा खासगी आणि सहकारी दूध संघाकडून दूध उत्पादनांना अल्प भाव दिला जातो. त्यामुळे दूध उत्पादकांना तोटा सहन करावा लागतो. ही समिती दुधाचे किमान दर निश्चित करणार आहे.