देहूतील (पुणे) इंद्रायणी आणि पवना नद्यांची स्वच्छता होणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे – देहू आणि आळंदी या तीर्थस्थळातून वहाणार्या इंद्रायणी आणि पवना या दोन्ही नद्यांची स्वच्छता विकास आराखडा (डी.पी.आर्.) २ मासांमध्ये सिद्ध करण्यात येईल. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपासून नदी स्वच्छतेच्या कामाला प्रत्यक्षामध्ये प्रारंभ होईल. येत्या २ वर्षांमध्ये हे काम पूर्णत्वाला जाईल, या कामांना तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या उगमापासून ते संगमापर्यंत लवकरच पहाणी करावी. सरकारी निधी आणि शासकीय संस्था यांच्या सहभागातून शुद्धीकरण प्रकल्प राबवावा. यासाठी पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग असावा, असेही सामंत यांनी सुचवले.
महापालिकेचे आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘नदी प्रदूषणावरील नियंत्रणाविषयी केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. नाल्यांद्वारे नदीमध्ये कचरा, प्लास्टिक, दूषित पाणी जाऊ नये, यासाठी ‘मेकॅनिकल स्क्रिन’ लावण्यात आल्या आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे.’’