हिंदु शिक्षिकांनी २ मुसलमान विद्यार्थिनींचा हिजाब उतरवण्याचा प्रयत्न केला असता संघर्ष !
|
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील हयातनगरच्या एका शाळेतील प्राचार्या आणि शिक्षिका यांनी दहावी इयत्तेत शिकणार्या दोन मुसलमान विद्यार्थिनींनी घातलेला हिजाब काढण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात आणि या विद्यार्थिनींमध्ये संघर्ष झाला. २३ जून या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी प्राचार्या पूर्णादेवी श्रीवास्तव आणि ३ शिक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
#AkhandBharat : कर्नाटक में हिजाब का विवाद भले शांत होता दिख रहा है लेकिन इसकी आंच पर पड़ोसी राज्य तेलंगाना में पहुंचती दिखाई दे रही है… रंगारेड्डी के एक कॉलेज में बुर्का पहनकर एग्जाम देने गई छात्राओं को परीक्षा में शामिल होने से इनकार कर दिया गया…
Watch:… pic.twitter.com/byw1hzyj6f
— Bharat 24 – Vision Of New India (@Bharat24Liv) June 19, 2023
२३ जून या दिवशी एका तासाच्या वेळी शिक्षिकेने दोन्ही मुसलमान विद्यार्थिनींना ‘तुम्ही शाळेत हिजाब घालण्याची अनुमती मिळवली आहे का ?’, असे विचारले. जेव्हा अन्य एका शिक्षिकेने मुलींचा हिजाब काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका विद्यार्थिनीने त्याला विरोध केला आणि तिच्या आई-वडिलांशी यासंदर्भात बोलण्यास सांगितले. कालांतराने प्राचार्या श्रीवास्तव यांनी संबंधित विद्यार्थिनींना ‘धर्म शाळेच्या बाहेर ठेवायला हवा’, अशा शब्दांत सुनावले. शाळा धर्मनिरपेक्ष असल्याने ख्रिस्ती विद्यार्थ्यांनाही क्रॉस घालण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. मुसलमान शिक्षिकाही बुर्का काढूनच शाळेत प्रवेश करतात. त्यानंतर प्राचार्या श्रीवास्तव यांनी बलपूर्वक या विद्यार्थिनींचा हिजाब उतरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला.
संपादकीय भूमिका
|