वर्ष २०१४ मध्ये रशियाने नियंत्रणात घेतलेल्या युक्रेनच्या गावावर युक्रेनकडून नियंत्रण मिळवण्यास प्रारंभ !
लंडन (इंग्लंड) – वर्ष २०१४ मध्ये रशियाने नियंत्रणात घेतलेल्या युक्रेनच्या पूर्व डॉनबास गावावर युक्रेनने पुन्हा नियंत्रण मिळवण्यास आरंभ केल्याचा दावा युनायटेड किंगडमच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार २४ जून या दिवशी एका युक्रेनी सैनिकी अधिकार्याने दावा केला होता की, युक्रेनने रशियाने नियंत्रणात घेतलेले क्रास्न्होर्विका गाव परत मिळवले आहे.
#BREAKING #Ukraine says it retakes southeastern village of Rivnopil from Russian control in the southeast pic.twitter.com/4Rat3Kcypi
— Guy Elster (@guyelster) June 26, 2023
हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी त्यांचे सैन्य सर्व स्तरांवर आगेकूच करत असल्याचे म्हटले आहे. रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा युक्रेनवर आक्रमण केले, त्यानंतर युक्रेन वर्ष २०१४ मध्ये रशियाशी झालेल्या युद्धाच्या वेळी रशियाने नियंत्रणात मिळवलेली युक्रेनी क्षेत्रे प्रथमच परत मिळवू लागला आहे, असे म्हटले जात आहे.