भारतीय ‘युनीकॉर्न’ आस्थापनांच्या संख्येत कमालीची घट !
गेल्या वर्षी २४ आस्थापने ‘युनीकॉर्न’च्या कक्षेत आल्याच्या तुलनेत यंदा केवळ ३ आस्थापनांनी गाठला दर्जा !
नवी देहली – भारतामध्ये नवीन उद्योगांच्या निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रशासनाने अनेक योजना चालू केल्या आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक नव्या उद्योगांची भरभराट झाली आहे; परंतु वर्ष २०२३ मध्ये युनीकॉर्न आस्थापनांच्या संख्येत मात्र कमालीची घट पहायला मिळाली. (ज्या नव्या आस्थापनांची नोंद शेअर बाजारात न होताही त्यांचे बाजारमूल्य १०० कोटी डॉलर (८ सहस्त्र कोटी रुपयांपेक्षा अधिक) होते, त्यांना ‘युनीकॉर्न’ म्हटले जाते.) गेल्या वर्षीच्या पहिल्या ५ मासांत २४ आस्थापने ‘युनीकॉर्न’च्या कक्षेत आली, तर यंदा याच कालावधीत हा आकडा केवळ ३ राहिला.
67% CFOs in Indian unicorns don’t have prior startup experience: Study https://t.co/wbee446tJh via @et_cfo #CFO #unicorn #startup
— ETCFO (@et_cfo) June 20, 2023
गेल्या वर्षी एकूण १८ आस्थापनांनी युनीकॉर्नचा दर्जा गमावला असला, तरी ४० आस्थापनांनी तो प्राप्त केला होता. चीनमध्ये १ सहस्त्र युनीकॉर्न आस्थापने असून एका अनुमानानुसार भारतात पुढील ५ वर्षांत २०० आस्थापने हा दर्जा प्राप्त करतील.