एका मुसलमानासह चौघांना अटक : ८ ते १० आक्रमणकर्त्यांवर गुन्हे नोंद
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्धा जिल्हा संघचालकांना मारहाण केल्याचे प्रकरण
हिंगणघाट – येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण करण्यात आली. महाराष्ट्र परिवहन निगमच्या बसमधून राजपूत प्रवास करत होते. त्या वेळी तेथील २ समुदायांच्या युवकांमध्ये वाद झाल्याने राजपूत यांनी त्यात हस्तक्षेप केला. या वेळी एका तरुणाने त्यांना शिवी दिली आणि नंतर नांदगाव येथे राजपूत यांना उतरूवन मारहाण केली. या प्रकरणी शेख तनवीर या तरुणाला अटक करण्यात आली असून आणखी चौघांना कह्यात घेण्यात आले आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे.
Wardha News : आरएसएस जिल्हा संघचालक मारहाणप्रकरणी पाच युवक अटकेत, एकाचा शाेध सुरु : एसपी नुरुल हसन#saamtv #wardha #WardhaNews #RSS #Police #Arrests #NurulHasanhttps://t.co/4GTU3igF4O
— SaamTV News (@saamTVnews) June 27, 2023
घायाळ झालेल्या राजपूत यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घडलेल्या घटनेप्रकरणी २६ जून या दिवशी शहर बंद ठेवण्यात आले होते. ८ ते १० आक्रमणकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमानांना कायदा आणि सुव्यवस्थेचा धाकच उरला नसल्याचे दर्शवणारी घटना ! |