करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजय सिंह सेंगर यांना मारहाण !
मुंबई – महाराष्ट्र करणीसेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांना २७ जून या दिवशी पनवेल महानगरपालिका येथे २ व्यक्तींनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी सेंगर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. सेंगर हे त्यांच्या कामानिमित्त पनवेल महानगरपालिकेत आले असता हे आक्रमण करण्यात आले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
( सौजन्य झी २४ तास )
औरंगजेबाच्या कबरीवर फुले वहाण्याचा निषेध केल्याने मला मारहाण ! – सेंगर यांचा आरोप
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते. याचा मी निषेध केला होता. याचा राग मनात धरून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुभाष गायकवाड आणि सागर पगारे यांनी मला मारहाण केली, असा आरोप अजय सिंह सेंगर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केला. (सरकारने यातील दोषींवर तात्काळ कारवाई केली पाहिजे ! – संपादक)