अपघातात मृत्यू झालेल्या हिंदु तरुणाचा मृतदेह कालव्यात फेकणार्या दोघा धर्मांध मुसलमानांना अटक
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना !
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे २२ जून या दिवशी मनोज कुमार या मजुराला चारचाकी गाडीने ठोकर दिल्याने तो घायाळ झाला होता. यानंतर त्याला याच चारचाकी गाडीतील दोघे जण उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोघांनी त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. या प्रकरणी महंमद दिलखुश आणि महंमद उस्मान यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडील चारचाकी गाडीही जप्त केली आहे.
➡️थाना छपार पुलिस द्वारा एक्सिडेंट में मृत व्यक्ति को गाडी में डालकर नहर में फैंकने वाले 02 अभियुक्त गिरफ्तार, घटना में प्रयुक्त स्विफ्ट गाडी बरामद।#UPPolice pic.twitter.com/c3L7FtnDdE
— MUZAFFARNAGAR POLICE (@muzafarnagarpol) June 25, 2023
पोलिसांच्या चौकशीत महंमद दिलखुश याने सांगितले की, त्यांच्याकडे चारचाकी चालवण्याची अनुज्ञप्ती (परवाना) नव्हती. ते गाडीतून रोहना येथे जात असतांना त्यांनी मनोज कुमार याला धडक दिली.
मुजफ्फरनगर में एक्सीडेंट से घायल को ले गया था अस्पताल, रास्ते में मौत से डरकर नहर में दिया था फेंक, शव हुआ बरामद – Royal Bulletin https://t.co/nlJQoI9Lk4
— Royal Bulletin (@RoyalBulletin) June 24, 2023
यात तो घायाळ झाल्याने त्याला उपचारार्थ रुग्णालयात नेत असतांना त्याचा गाडीतच मृत्यू झाला. याची माहिती त्याने उस्मान याला दिली. तो आल्यानंतर या दोघांनी मनोज कुमार याचा मृतदेह चरथावल येथील कालव्यात फेकून दिला.