चीनपेक्षा भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न अधिक रहाणार !
नवी देहली – ‘एस् अँड पी’ या मानांकन देणार्या संस्थेने भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपीचा) दर ६ टक्के रहाणार असल्याचे त्याचे निरीक्षण कायम ठेवले आहे. यापूर्वी मार्च मासामध्येही अशाच प्रकारचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते.
क्या चीन, क्या अमेरिका, भारत के आगे सब पानी-पानी, ग्लोबल एजेंसी का भारत पर भरोसा#IndianGrowth | #America | #China https://t.co/Kp1C8Zorpa
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) June 27, 2023
आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये भारताचा हा दर सर्वाधिक असणार आहे. चीनच्या तुलनेतही हा दर अधिक रहाणार आहे, असेही या संस्थेने म्हटले आहे. भारतासह व्हिएतनाम आणि फिलिपाइन्स या देशांचेही सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ६ टक्के रहाणार आहे.