अक्षरधाम मंदिराजवळ ड्रोन जप्त : बांगलादेशी महिलेची चौकशी !
नवी देहली – येथील अक्षरधाम मंदिराजवळ उडणारे ड्रोन पोलिसांनी जप्त केले आणि ते उडवणार्या बांगलादेशी महिलेची चौकशी केली, अशी माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली. अक्षरधाम मंदिराजवळ ड्रोन उडत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोचले. तेथे मोमो मुस्तफा नावाची एक बांगलादेशी महिला अनधिकृतपणे ड्रोन उडवत असल्याचे त्यांना आढळले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेष करत आहेत.
प्रसिद्ध अक्षरधाम मंदिर के पास बिना परमिशन ड्रोन उड़ाने वाली की पहचान हो गई है। #Akshardhamtemple #IndiaTvHindi @Atul_Bhatia80https://t.co/1KLyrvis4Y
— India TV (@indiatvnews) June 26, 2023
संपादकीय भूमिकाभारतात कारवाई होण्याचे जराही भय न उरल्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांची आता ड्रोनद्वारे अप्रत्यक्षपणे हेरगिरी करण्यापर्यंत मजल गेली आहे ! हे पोलिसांना लज्जास्पद ! |