दापोलीतील भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू
मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य
दापोली – तालुक्यातील आसूद जोशी आळीजवळ मॅक्झिमो गाडी आणि ट्रक यांच्यात २५ जून या दिवशी समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला होता. या अपघातात मॅक्झिमो गाडीच्या चालकासह ८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
दापोली: भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदतhttps://t.co/srICuYCAke
— LoksattaLive (@LoksattaLive) June 26, 2023
#रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर #आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून याविषयी संपूर्ण माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले.
या…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2023
या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. तसेच घायाळांवरही योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.