बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांतील हाणामारीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू
कूचबिहार (बंगाल) – बंगालमध्ये पंचायत निवडणुकीची प्रक्रिया चालू होण्यापूर्वीच तेथे हिंसाचार चालू आहे. कूचबिहारमधील दिनहाटा येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सभेनंतर तृणमूल काँग्रेसच्याच दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात गोळी लागल्याने एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या हाणामारीत काही जण घायाळ झाले आहेत. बंगालमध्ये ८ जुलै या दिवशी पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बंगालमध्ये उसळलेला हिंसाचार पहाता विरोधी पक्षांनी केंद्रीय सुरक्षादल तैनात करण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने राज्यात सुरक्षादल तैनात केले आहेत. (न्यायालयाला असा आदेश का द्यावा लागतो ? सरकारला का कळत नाही ? – संपादक)
पश्चिम बंगाल के कूच बिहार में दो गुटों में झड़प: घटना में 5 लोगों को गोली लगी, एक की मौत; तृणमूल नेता बोले- भाजपा कार्यकर्ताओं ने हमला किया#WestBengalPanchayatElections2023 https://t.co/cp0CV8TLYg
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 27, 2023
संपादकीय भूमिकाबंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू होणार ? |