मॅनहोलची स्वच्छता करणार्या कर्मचार्याच्या अंगावरून गाडी गेल्याने मृत्यू !
मुंबई – मॅनहोल (भूमीगत गटारात जाण्याचा मार्ग) मध्ये उतरून ड्रेनेजची यंत्रणा स्वच्छ करणार्या कर्मचार्याच्या अंगावरून गाडी गेली. जगवीर यादव (वय ३७ वर्षे) असे त्याचे नाव आहे. तो वर येत असतांनाच गाडी अंगावरून गेल्याने तो मॅनहोलमध्येच अडकला. उपस्थितांनी त्याला त्याच अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात भरती केले; पण त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गाडीचालक विनोद आणि कंत्राटदाराला अटक केली आहे.