दुमजली बंगला खचून वृद्ध आईसह मुलाचा मृत्यू !
मुंबई – विद्याविहार पूर्वेला असलेल्या चित्तरंजन कॉलनीत २५ जून या दिवशी दुमजली बंगला ८ ते १० फूट खाली खचला होता. रात्री विलंबाने हा बंगला पूर्णपणे पाडून आतमध्ये अडकलेले नरेश पलांडे (वय ५६ वर्षे) आणि त्यांची आई अलका पलांडे (वय ९४ वर्षे) यांना २० घंट्यांनंतर बाहेर काढण्यात आले; पण रुग्णालयात भरती करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.