अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने १९ जागा जिंकल्या !
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीचे प्रकरण
मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ चालू असलेल्या एस्.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. बँकेतील संचालकपदाच्या १९ जागांसाठी ही निवडणूक झाली होती. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून कामगार संघटनेच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. या विजयानंतर सदावर्ते यांच्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. या वेळी काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत नथुराम गोडसे यांचे छायाचित्र असलेले बॅनर्स लावण्यात आले होते.