सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवापूर्वी आणि ब्रह्मोत्सवाच्या दिवशी साधिकेला आलेल्या अनुभूती !
१. ब्रह्मोत्सवापूर्वी
१ अ. सहसाधिकेशी बोलतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘पूर्ण पुरुषोत्तम’, असा करणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही ‘गुरुदेव ‘पूर्ण पुरुषोत्तम’ आहेत’, असे सांगणे : ‘२६.४.२०२३ या दिवशी मी सहसाधिकेशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी बोलत होते. तेव्हा मी म्हणाले, ‘‘ते प्रत्येक कृती किती परिपूर्ण करतात ! ते पूर्ण पुरुषोत्तमच आहेत.’’ प.पू. गुरुदेवांना ‘पूर्ण पुरुषोत्तम’ म्हणायला माझे आध्यात्मिक ज्ञान आणि साधना अल्प आहे; पण त्या दिवशी ते मला आतूनच सुचले. ४.५.२०२३ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘आमचे गुरुदेव ‘पूर्ण पुरुषोत्तम’ आहेत.’’
१ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या बाहेरील झाडे नाचत आहेत’, असे वाटणे आणि भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘गुरुदेवांच्या जन्मोत्सवाची वाट पहात असल्याने झाडे नाचत आहेत’, असे सांगणे : एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांच्या खोलीच्या बाहेरील झाडे सतत हालत होती. तेव्हा ‘झाडे नाचत आहेत का ?’, असे मला वाटत होते. त्या वेळी गुरुदेव म्हणाले, ‘‘बघा, झाडे कशी सतत हालत आहेत !’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘हो. त्या झाडांनी चांगले कर्म केले असावे; म्हणून त्यांना सतत श्रीविष्णूचे दर्शन होते. किती भाग्यवान आहेत ही झाडे !’’ त्या वेळी ते सुंदर हसले. त्यानंतर भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘निसर्ग आणि झाडे नाचत आहेत. ती गुरुदेवांच्या जन्मोत्सवाची वाट पहात आहेत.’’
२. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी
अ. ११.५.२०२३ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी माझा ‘निर्विचार’, हा जप सतत चालू होता.
आ. एरव्ही मला आधाराविना (‘सपोर्ट’विना) बसता येत नाही; पण त्या दिवशी मी बैठक व्यवस्थेसाठी केलेल्या उंच लोखंडी बाकावर काहीही त्रास न होता ३ घंटे बसू शकले.’
– आधुनिक वैद्या (डॉ.) रूपाली भाटकार, फोंडा, गोवा. (१५.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |