‘ब्रह्मोत्सवा’त साधकांशी प्रत्यक्ष न बोलताही त्यांचे मन जिंकणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
३ जुलै २०२३ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…
‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ होता. त्या वेळी अनेक जिल्ह्यांतील साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले. या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना मार्गदर्शन केले नाही. परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘अस्तित्व’ आणि ‘दर्शन’ यांद्वारे अनेक साधकांना पुष्कळ अनुभूती आल्या. या सोहळ्याने सर्व साधक तृप्त झाले. परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्यक्ष न बोलताही सर्व साधकांचे मन जिंकले होते. परात्पर गुरु डॉक्टर जणू ‘मौना’त होते आणि साधकांनीही परात्पर गुरु डॉक्टरांना ‘मौन’ राहून अनुभवले. हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे.
अन्य काही संप्रदायांमध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाला प्राधान्य असते. तसे नसेल, तर ‘तो कार्यक्रम आहे’, असे कुणाला वाटत नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना शब्दांच्या पलीकडील अध्यात्म अनुभवण्यास शिकवले आहे. त्याचा हा परिणाम आहे’, असे मला वाटते.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |