गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद करणार्या पोलिसांच्या विरोधात पुणे येथे चिल्लर फेक आंदोलन’ !
पुणे – येथील लोणी काळभोर पोलीस ठाणे या ठिकाणी २५ जून या दिवशी गोरक्षकांच्या वतीने सकाळी साडेअकरा वाजता ‘चिल्लर फेक आंदोलन’ करण्यात आले. गोरक्षकांवर जाणूनबुजून खोटे गुन्हे नोंद केल्याविषयी पोलीस प्रशासनावर कारवाई व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गोरक्षक श्री. अक्षय कांचन यांनी एक गाडी पकडली होती. त्यामधील म्हशी पोलिसांनी कोणताही विचार न करता पशूवधगृहामध्ये दिल्या, कसायांना साहाय्य केले, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे गोरक्षक श्री. रवींद्र पडवळ यांनी या वेळी सांगितले. (पोलिसांनी याविषयी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे ! – संपादक) या वेळी समस्त हिंदु आघाडीचे सर्वश्री मिलिंद एकबोटे, हृषिकेश कामठे, अक्षय कांचन, राहुल कदम, रवींद्र पडवळ आदी गोरक्षक या वेळी उपस्थित होते.
पोलिसांनी गोरक्षकांकडे गुन्हेगार म्हणून पाहू नये ! – मिलिंद एकबोटे, समस्त हिंदू आघाडी
श्री. मिलिंद एकबोटे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, गोरक्षक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. कायद्याच्या कार्यवाहीसाठी ते काम करतात. गोरक्षक जिवावर उदार होऊन, नि:स्वार्थपणे गोरक्षणाचे काम करतात. गोरक्षण करणे म्हणजे कायदा मोडणे नव्हे, पोलिसांनी गोरक्षकांकडे गुन्हेगार म्हणून पाहू नये. आज जे गोरक्षण होत आहे, यामध्ये गोरक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. आजपर्यंत जेवढे गोरक्षण झाले आहे, तेवढे सगळे गोरक्षकांनी केले आहे. पोलिसांनी स्वयंप्रेरणेने केलेले गोरक्षण कुठेही दिसत नाही. पोलीस साहाय्य करतात, याविषयी आम्ही त्यांचे आभारी आहोत. पोलिसांना अशी विनंती आहे की, त्यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची कार्यवाही कठोरपणे करावी. (गोवंशहत्या रोखण्यासाठी गोरक्षक जसे प्राणपणाने प्रयत्न करत आहेत, तसे प्रयत्न पोलिसांनी केल्यास गोहत्या रोखण्यासाठी नक्कीच साहाय्य होईल ! – संपादक)
गोरक्षकांच्या वतीने सर्वश्री मिलिंद एकबोटे, हृषिकेश कामठे, अक्षय कांचन, राहुल कदम, रवींद्र पडवळ, धनश्रीताई मस्के यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय चव्हाण आणि इतर सहकारी अधिकारी पोलीस यांच्या समवेत सविस्तर चर्चा करून आंदोलन मागे घेतले.
या वेळेस पोलिसांनी सांगितले की, कायदा हातात घेऊन जर कुणी गोवंशियांना पशूवधगृहात नेत असल्याचे आपणास आढळून आल्यास पोलिसांना कळवा, आम्ही त्यावर कारवाई करू. केवळ तुम्ही कायद्याचे पालन करून आम्हाला सहकार्य करावे.
संपादकीय भूमिका :
|