धर्मांधाने मागासवर्गीय मुलीवर केलेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करावी !
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन
अहिल्यानगर – कोतूळ, ता. अकोले येथे भर बाजारपेठेत घर असलेल्या अतिक सादिक मणियार या जिहाद्याने ५ जून या दिवशी दिवसा ढवळ्या एका मागासवर्गीय मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी अतिकला अटक करण्यात आली असून आरोपीला जामीन मिळू नये; म्हणून पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी, तसेच आरोपीने मागासवर्गीय मुलीवर केलेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी २५ जून या दिवशी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
निवेदनात म्हटले आहे की,
१. हा जिहादी हा बारावी झालेला आणि बेकार असून कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असतांना अत्यंत मौजमजेत जीवन जगत होता. त्यासाठी त्याच्याकडे एवढा पैसा कोठून आला, सदर पैसे त्याला कोण पुरवत होते याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
२. या व्यक्तीने अनेक मुली, विवाहित महिला यांना जाळ्यात ओढून अपलाभ घेतला आहे.
३. हेे कृत्य तो एकटा करणे शक्य नाही, त्यामध्ये मोठी साखळी असण्याची शक्यता आहे. त्याचा शोध घेऊन इतर आरोपींना कह्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करावी.
४. या व्यक्तीचे सामाजिक माध्यमाचे खाते पडताळले असता अत्यंत धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. त्याद्वारे हिंदु महिलांची फसवणूक करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करून त्यांचे लैंगिक शोषण करून त्यांचे आयुष्य उद़्ध्वस्त करण्याच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा हा भाग असावा, असा आमचा संशय आहे. याविषयी या गुन्ह्याचे उच्चस्तरीय अन्वेषण करण्यात यावे आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी.