मध्यप्रदेशच्या हिंदु युवतीच्या विरोधात बेंगळुरूत उमर फारूकने रचले लव्ह जिहादचे षड्यंत्र !
लव्ह जिहाद्यांना अद्दल घडवली जाईल ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा
दमोह (मध्यप्रदेश) – येथील एका २० वर्षीय हिंदु युवतीने तिच्यावर बेंगळुरूतील उमर फारूक नावाच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पीडितेने सांगितले, ‘मी बेंगळुरू येथे नोकरी करत असतांना ३२ वर्षीय फारूकने त्याचे नाव राजीव असल्याचे सांगून तो हिंदु असल्याचे भासवले. विवाहाचे आमिष दाखवून त्याने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जेव्हा मला त्याची खरी ओळख पटली, तेव्हा त्याने माझी अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी दिली. मला तो मारहाणही करू लागला.’
बेंगलुरु लव-जिहाद: MP के गृहमंत्री नरोत्तम मिश्रा ने कहा, प्रियंका गांधी बच्ची को न्याय दिलानें में मदद करें #priyankagandhi #karnataka #lovejihad #damoh #प्रियंकागांधी #कर्नाटक #लवजिहाद #दमोह https://t.co/nu1wco0IMB
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) June 24, 2023
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे सांगत कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस सरकारवर आरोप केला आहे. मिश्रा म्हणाले की, ‘लडकी हूं लढ सकती हूं’ अशी घोषणा देणार्या काँग्रेसच्या प्रियांका गांधी वढेरा या पीडितेला न्याय मिळण्यासाठी आरोपी फारूकची अटक होण्यासाठी साहाय्य करणार आहेत का ? मिश्रा यांनी २३ मे या दिवशी या प्रकरणी भोपाळ येथे पत्रकारांना संबोधित करतांना म्हटले की, लव्ह जिहाद्यांची येथे अद्दल घडवली जाईल !
संपादकीय भूमिकालव्ह जिहादच्या विरोधात कायदे करूनही त्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच उरलेले नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी आता हिंदु युवती आणि महिला यांना यापासून वाचवण्यासाठी धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण देणेच आवश्यक ! |