‘द केरल स्टोरी’ चित्रपट विकत घेण्यास एकही ओटीटी मंच सिद्ध नाही !
यामागे षड्यंत्र असल्याचा दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा आरोप
(ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म’ म्हणजे इंटरनेटद्वारे भ्रमणभाष किंवा संगणक यांवर पहाता येणारे कार्यक्रम दाखणारा मंच)
मुंबई – केरळमध्ये लव्ह जिहादद्वारे हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्यांचे धर्मांतर करून त्यांना इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्यासाठी नेण्यात आल्याच्या घटनांवर आधारित ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट ओटीटी मंचावरून प्रदर्शित करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र त्याला कुणीही विकत घेण्यास सिद्ध नसल्याचे दिसून येत आहे. याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी यामागे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. या चित्रपटाला बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये प्रदर्शित करण्यात आले नव्हते. येथे सरकारांकडूनच विरोध करण्यात आला होता.
सुदीप्तो सेन की फिल्म के खिलाफ रची जा रही साजिश? द केरल स्टोरी को नहीं मिल रहा ओटीटी खरीदार#TheKeralaStory #TheKeralaStoryOTTRelease #SudiptoSen #AdahSharmahttps://t.co/uIxmLN9vQ7
— Amar Ujala (@AmarUjalaNews) June 24, 2023
सुदिप्तो सेन याविषयी म्हणाले की, आम्हाला अजूनही कोणत्याही ओटीटी मंचाकडून योग्य प्रस्ताव मिळालेला नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत. असे वाटते की, चित्रपटसृष्टी आमच्या विरोधात उभी राहून आम्हाला शिक्षा देऊ पहात आहे. आमच्या चित्रपटाची कमाई पाहून बर्याच लोकांच्या पोटात दुखत आहे. कोणताही मोठा ओटीटी मंच हा चित्रपट विकत घेण्यास सिद्ध नाही.
संपादकीय भूमिकाहिंदूंवरील अत्याचार दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कशा पद्धतीने विरोध होतो, हे ‘द केरल स्टोरी’ चित्रपट एक उदाहरण आहे ! अशा घटना थांबवण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे ! |