पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर अणूबाँब डागण्याच्या तोफा तैनात !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीन पाकिस्तानला त्याच्या सीमाभागात खंदक (बंकर) बांधण्यासाठी साहाय्य करत आहे, तसेच चीनने पाकिस्तानला अण्वस्त्रे डागणार्या तोफाही दिल्या आहेत. पाकने या तोफा काश्मीरमधील सीमेवर तैनात केल्या आहेत. ‘एस्एच्-१५’ असे या तोफांचे नाव आहे. चीनच्या आस्थापनाने पाकला अशा २३६ तोफा देण्याचा करार केला आहे. यांतील काही तोफा पाकला मिळाल्या आहेत. या तोफांमधून एका मिनिटामध्ये ४ ते ६ तोफगोळे डागता येतात.
सौजन्य: News India
तज्ञांचे म्हणणे आहे की, या तोफांमधून अणूबाँब डागण्यासाठी पाकला तसे लहान अणूबाँब बनवावे लागतील. पाक अशा प्रकारचे लहान अणूबाँब बनवत आहे.
संपादकीय भूमिका‘आक्रमण हा संरक्षणाचा सर्वोत्तम उपाय आहे’, हे लक्षात घेऊन भारताने पाकला लक्षात राहील, असे आक्रमण त्याच्यावर करणे आवश्यक आहे ! |