उत्तरप्रदेशमध्ये प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली मदरसा चालवणार्या मौलवीला अटक
(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली मदरसा चालवणार्या शौकत अली नावाच्या मौलवीला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली.
कोचिंग की आड़ में खोल दिया मदरसा: न कुर्सी न मेज अंदर होने लगी नमाज़, गाजियाबाद पुलिस ने मौलवी शौकत अली को दबोचा#Ghaziabad #Namazhttps://t.co/c02BncBuFq
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 25, 2023
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गाझियाबादमधील खोडा परिसरातील दीपक विहार भागात शौकत अली नावाचा मौलवी ‘फ्यूचर ट्रॅक’ नावाची प्रशिक्षण संस्था चालवत होता. या संस्थेचे मदरशात रूपांतर झाले होते. दीपक विहार परिसरात रहाणार्या हिंदूंनी या मदरशात चालणार्या नमाजपठणाला विरोध दर्शवला होता. दीपक विहारमधील प्रेम सिंह नावाच्या व्यक्तीने या अनधिकृत मदरशाविषयी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. २३ जून या दिवशी पोलिसांचे पथक दीपक विहार परिसरात गस्त घालत असतांना सदर संस्थेजवळ पोलिसांना गर्दी दिसली. ही गर्दी नमाजपठण करणार्यांची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मौलवीचे हे कृत्य सामाजिक सलोखा बिघडवणारे आणि दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याने पोलिसांनी मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
आरोपी मौलवी पूर्वी अनधिकृत मदरसा चालवायचा. पोलिसांनी तो बंद केला होता.यानंतर त्याने आता भाड्याचे घर घेऊन त्यात पुन्हा मदरसा चालू केला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाप्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली अनधिकृत मदरसा चालू करेपर्यंत पोलीस झोपले होते का ? यातील उत्तरदायी पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे ! |