हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्कार प्रदान !
|
नोएडा (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. ‘स्मृतीचिन्ह’ आणि १ लाख रुपयांचा धनादेश, असे या पुरस्कारचे स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ‘सेव्ह कल्चर सेव्ह इंडिया फाऊंडेशन’च्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील ग्रेटर नोएडा येथील गौतमबुद्ध विद्यापिठात पार पडला. या वेळी व्यासपिठावर ‘सेव्ह कल्चर सेव्ह इंडिया फाऊंडेशन’चे संस्थापक तथा भारताचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर उपस्थित होते. राष्ट्र आणि भारतीय संस्कृती यांकडे वक्रदृष्टीने पहाणार्यांच्या विरोधात सातत्याने संवैधानिक मार्गाने संघर्ष करणे, हिंदुद्वेषी चित्रकार एम् एफ् हुसेन आणि डॉ. झाकीर नाईक यांचे राष्ट्र तथा समाज विरोधी स्वरूप लोकांसमोर आणणे, तसेच भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ पुस्तकांचे लेखन करणे, यांसाठी श्री. रमेश शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
Chief Minister of Uttar Pradesh @myogiadityanath Ji felicitates @Ramesh_hjs, National Spokesperson, Hindu Janajagruti Samiti with Sanskritik Yoddha Puraskar 2023.
The award was presented under the aegis of Save Culture Save India Foundation founded by @UdayMahurkar Ji. pic.twitter.com/xl7pbCC5rI
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 25, 2023
Heartiest Congratulations to @Vishnu_Jain1 @swati_gs @Ramesh_hjs & others for being awarded truly prestigious सांस्कृतिक योद्धा पुरस्कार for outstanding work in safeguarding Indian culture & Hinduism at large!@UdayMahurkar ji thanks for acknowledging the work of the Hindu might pic.twitter.com/9xOD2NHOXP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 26, 2023
UP Chief Minister @myogiadityanath Ji felicitates @Ramesh_hjs, National Spokesperson, @HinduJagrutiOrg with Sanskritik Yoddha Puraskar – 2023.
Save Culture Save India Foundation founded by @UdayMahurkar Ji.#Goa_VHRM_Success pic.twitter.com/Iy30YVawVA
— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) June 26, 2023
संस्कृती रक्षणासाठी लढा देण्यासाठी ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते तथा सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनाही हा पुरस्कार देण्यात आला. यासह चित्रपट निर्माते प्रवीण चतुर्वेदी, पत्रकार स्वाती गोयल शर्मा, पत्रकार प्रदीप भंडारी, वैशाली शहा, संजीव नेवर आणि मनीष बर्दिया यांनाही ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार २०२३’ने सन्मानित करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !
गौतम बुद्ध विश्वविद्यालय, गौतमबुद्ध नगर में आयोजित ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार 2023’ कार्यक्रम में… https://t.co/p7EmkG0OS5
— Yogi Adityanath (@myogiadityanath) June 25, 2023
भारतियांनी कधीही संस्कृतीवरील आक्रमणे सहन केली नाहीत ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
विकृत साहित्याची निर्मिती करून देशातील युवापिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्यांना उघडे पाडण्यासाठी ‘कृपया ध्यान दे’ हा लघुपट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भारतियांनी अनेक वर्षे ब्रिटीश आणि मोगल यांच्याकडून अत्याचार सहन केले; पण ज्या वेळी त्यांनी भारतीय संस्कृती आणि मंदिरे यांवर आघात करण्यास प्रारंभ केला, त्या वेळी भारतियांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. भारतियांनी कधीही संस्कृतीवरील आक्रमणे सहन केली नाहीत. सध्या डिजिटल माध्यमातून संस्कृतीवर आक्रमणे होत आहेत. नुकतेच ‘गेमिंग अॅप’च्या माध्यमातून धर्मांतर केले जात असल्याचे प्रकरण उत्तरप्रदेश पोलिसांनी उघडकीस आणले आहे. देहलीतील घटना सर्वांनी पाहिल्या. यांत कशा प्रकारे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्यांची हत्या करण्यात आली, हे सर्वांनी पाहिले. या संदर्भात आम्ही सर्वप्रथम कायदा केला; पण प्राथमिक स्तरावर प्रत्येक कुटुंबामध्ये जागरुकता निर्माण होण्याची नितांत आवश्यकता आहे.