गुजरात दंगलीतील ३५ हिंदूंची २० वर्षांनंतर निर्दोष मुक्तता !
ढोंगी धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे आणि संघटना यांच्या दबावामुळे हिंदूंना अनावश्यक खटल्याला सामोरे जावे लागले ! – न्यायालयाची टिपणी
कर्णावती (गुजरात) – गुजरात राज्यातील हलोल येथील सत्र न्यायालयाने वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीच्या संदर्भातील ४ प्रकरणांमध्ये ३५ हिंदु आरोपींची निर्दोष मुक्तता केली. एकूण ५२ जणांवर आरोप प्रविष्ट करण्यात आले होते; मात्र गेल्या २० वर्षांत यांतील १७ जणांचा मृत्यू झाला.
गोधरा के रेल हादसे के बाद हुए दंगों के 35 आरोपी कोर्ट से बरी हुए#GodhraRiotsCasehttps://t.co/AZ9edCR7eF
— News18 India (@News18India) June 18, 2023
अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष बालकृष्ण त्रिवेदी यांनी निकाल देतांना म्हटले की, पोलिसांनी डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, व्यावसायिक, पंचायत अधिकारी आदी प्रमुख हिंदु व्यक्तींना यात अडकवले आणि ढोंगी धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे अन् संघटना यांच्या दबावामुळे आरोपींना अनावश्यक लांबलेल्या खटल्याला सामोरे जावे लागले. दंगलीतील कथित पीडितांचे विविध अधिकार्यांसमोर नोंदवलेल्या साक्षी विसंगत होत्या. त्यांना आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आल्यानुसार योग्य पुरावे देता आले नाहीत.
संपादकीय भूमिका
|