गोवा : झुवारीनगर येथे ‘जनकल्याण सेवा समिती’ यांचा सांकवाळ पंचायतीच्या विरोधात ‘झोळी’ कार्यक्रम
‘शंखवाळ तीर्थक्षेत्र गोशाळे’चा निधी अडवल्याचे प्रकरण
वास्को, २५ जून (वार्ता.) – सांकवाळ पंचायत क्षेत्रात मोकाट फिरणार्या गोवंशियांचे ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र गोशाळे’त संगोपन केले जाते. गोशाळेतील ७ गोवंशियांचे सरकारच्या पशूसंवर्धन खात्यातील योजनेच्या अंतर्गत संगोपन केले जाते. गोवंशियांच्या संगोपनासाठी सरकारकडून आलेला निधी सांकवाळ पंचायत अडवून ठेवते. सांकवाळ पंचायतीने हा निधी त्वरित गोशाळेला द्यावा, या मागणीवरून ‘जनकल्याण सेवा समिती’ यांनी काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सहकार्याने झुवारीनगर येथे २५ जून या दिवशी ‘झोळी’ कार्यक्रमाचे आयोजन केले. या आंदोलनात ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र गोशाळे’चे डॉ. कालिदास वायंगणकर, स्थानिक पंचसदस्य तुळशीदास नाईक आदींची उपस्थिती होती. प्रारंभी सांकवाळ पंचायतीचे उपसरपंच गिरीश पिल्लई यांच्या प्रभागात फिरून आंदोलनकर्त्यांनी गोशाळेसाठी निधीसंकलन केले.
याप्रसंगी डॉ. कालिदास वायंगणकर म्हणाले,
‘‘निधी अडवून ठेवल्यामुळे गोवंशियांना खावड (खाणे) घालण्यासाठी गोशाळेला निधीची टंचाई भासते. वास्तविक गोवंश मोकाट रस्त्यावर फिरतो, प्लास्टिक खातो आणि अपघातात मरत असतो. यामुळे गोवंशियांच्या रक्षणासाठी गोशाळा चालवली जाते.
गोशाळेतील ७ गोवंशियांसाठी समितीला सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे. सरकारने निधी पंचायतीमार्फत न देता तो थेट गोशाळेला द्यावा.’’ पंचसदस्य तुळशीदास नाईक म्हणाले, ‘‘पंचायतीचे उपसरपंच गिरीश पिल्लई विशिष्ट समाजाच्या दबावाला बळी पडून ही सतावणूक करत आहेत. पंतायतीने त्वरित निधी गोशाळेला न दिल्यास हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.’’ (राजभवनमध्ये गोशाळा उभारणारे सरकार यात लक्ष घालून ही समस्या सोडवेल का ? – संपादक)
हे ही वाचा –
♦ गोवा : सांकवाळ शंखवाळी तीर्थक्षेत्र गोशाळेला आर्थिक साहाय्य देण्यास टाळाटाळ
https://sanatanprabhat.org/marathi/691511.html