देहली रेल्वे स्थानकावर खांबाद्वारे विजेचा धक्का लागल्याने महिलेचा मृत्यू
नवी देहली – येथील रेल्वे स्थानकावर एका महिलेला खांबाद्वारे विजेचा धक्का लागल्याने तिला मृत्यू झाल्याची घटना घडली. येथे पाऊस पडत असल्याने खांब भिजला होता आणि त्यातून विद्युत् प्रवाह जात होता. साक्षी आहुजा असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी चालू केली आहे.