पुण्याचे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड निलंबित !
पुणे – विभागीय आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सेवेत ठेवले, तर अन्वेषणात अडथळे निर्माण होतील. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, असे पत्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाला दिले होते. त्याअन्वये रामोड यांना निलंबित करण्याच्या संदर्भातील प्रस्तावाची नोंद घेत त्यांना निलंबित केले आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे उपसचिव प्रशांत साजनीकर यांनी आदेश काढला आहे. भूसंपादनाच्या मोबदल्याचे अपील संमत करण्यासाठी तक्रारदाराकडून ८ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले गेल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली होती.
संपादकीय भूमिकाअशा भ्रष्ट अधिकार्यांना कायमस्वरूपी कामावरून काढून टाकले पाहिजे ! |