विद्याविहार येथे दुमजली बंगला ८ ते १० फूट खचला !
मुंबई – विद्याविहार पूर्वेकडील एक दुमजली बंगला आठ ते दहा फूट खचला. बंगल्यात दोनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता. बंगल्यात दोन कुटुंबे रहात होती. बंगला खचताच काही जणांनी बाहेर धाव घेतली, तर चारजण बंगल्यात अडकले. अग्निशमन दल, एन्डीआरएफ, पोलीस आणि पालिका अधिकारी यांनी दोघांना बाहेर काढले; मात्र दोघेजण आतच अडकून होते.