इगतपुरी (जिल्हा नाशिक) येथे गोमांस तस्करीच्या संशयातून जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, तर एक घायाळ !
नाशिक – जिल्ह्यातील इगतपुरी येथील सिन्नर घोटी मार्गावर गंभीरवाडीजवळ २ जणांना गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून अज्ञात १०-१५ जणांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर घायाळ झालेल्या दोघांनाही जवळच्या एस्.एम्.बी.टी. रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचार चालू असतांना एकाचा मृत्यू झाला. ही घटना २४ जूनच्या रात्री १०.३० वाजता घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन रात्रीच ८ संशयित आरोपींना कह्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा